crossorigin="anonymous">

sukanya samriddhi yojana समृद्धी सुकन्या योजनेतून मुलींसाठी मिळु शकतात 44 लाख रुपये पहा योजना नवीन रूपात-2023

sukanya samriddhi yojana समृद्धी सुकन्या योजनेतून मुलींसाठी मिळु शकतात 44 लाख रुपये पहा योजना नवीन रूपात- 2023

नमस्कार मित्रांनो, sukanya samriddhi yojana मधून मुलींसाठी मिळु शकतात 44 लाख रुपये !! कसे ते पहा सविस्तर खालील लेख वाचल्यानंतर नक्कीच आपणास ते समजेल.

          समृद्धी सुकन्या योजना म्हणजे SSY या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे दि. २२ जानेवारी २०१५ला उद्घाटन केले गेले. ही एक भारत सरकारने मुलींसाठी सुरू केलेली बचत योजना आहे. बेटी पढाओ बेटी बचाओ योजना ही केंद्र सरकार कडून सुरू केलेली योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना त्यांच्या भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. व त्यांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी सुकन्या समृद्धी योजनेफायदा होऊ शकतो. सुकन्या समृद्धी योजना ही एक छोटी बचत योजना आहे, जी दीर्घ कालावधीसाठी चालवली जात आहे. सुकन्या योजनेत पालक आपल्या मुलींच्या नावावर गुंतवणूक करतात. त्यांना SSY मधील गुंतवणुकीवर आयकर सवलत देखील मिळू मिळते. तसेच मुलींच्या नावावर मोठा निधी जमा होत होतो. मुलींच्या वयाची 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी sukanya samriddhi yojana गुंतवणूक केली जात असते. 

sukanya samriddhi yojana ची खास वैशिष्ट्ये-

sukanya samriddhi yojana या योजने खलील प्रमाणे वैशिष्ट्ये सांगता येतील या योजने अंतर्गत आई-वडील किंवा पालक मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते . सुकन्या समृद्धी योजने मध्ये उघडलेल्या खात्यात कमीत कमी 15 वर्षे गुंतवणूक करणे गरजेचं आहे तर या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो. खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर 2022-23 आर्थिक वर्षासाठी 7.6% दराने व्याज दिले जात आहे. गुंतवणूकदारांनी जर sukanya samriddhi yojana अंतर्गत 01 वर्षात 1.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्यांना करा मध्ये सूट मिळत असते.

कुटुंबातील किती मुलींना sukanya samriddhi yojana चा लाभ मिळू शकतो ?

 •  या योजनेंतर्गत कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच आपल्याला लाभार्थी बनवता येईल . मात्र काही प्रकरणांमध्ये ही संख्या वाढू पण शकते.
 • जर कुटुंबात अगोदर मुलगी असेल आणि त्याच्या नंतर जुळ्या जन्मल्या असतील किंवा त्यापेक्षा जास्त मुली एकाच जन्मल्या असतील तर त्यांनाही योजनेचे लाभ घेता येईल.
 • जुळ्या किंवा दोनपेक्षा अधिक मुली आधीच एकत्र जन्माला आल्यास, व नंतर जन्माला आलेली मुलगी या योजने साठी पात्र ठरणार नाही. कायदेशीररित्या दत्तक घेण्यात आलेल्या मुलींनाही या योजनेचा लाभ दिला जाईल.

sukanya samriddhi yojana योजनेचे फायदे –

 • – ही एक सरकारी बचत योजना आहे. जे केंद्र सरकार कडून मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने सुरू केले गेलेली योजना आहे.
 • – ही सरकारी योजना असल्यामुळे यात मार्केट रिस्क नाही म्हणजे आपल्याला हमखास परतावा मिळत असतो .
 • – ही दीर्घ कालावधीसाठी केंद्र सरकार कडून सुरू केली गेलेली अल्प बचत योजना आहे. ज्यामध्ये वार्षिक चक्रवाढीचा लाभ मिळत असतो . यात कमी गुंतवणुकीतही चांगला परतावा मिळत असतो.
 • – या योजने मध्ये दत्तक मुलगी म्हणजेच दत्तक मुलीचाही समावेश होत असतो .
 • – कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येत असतो.
 • – सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत गुंतवणूकदार त्याच्या आर्थिक स्थितीनुसार गुंतवणूक करू शकतो. यामध्ये एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त 1.5 लाखा पर्येंत गुंतवले जाऊ शकतात.
 • – मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावरही या खात्यातून काही रक्कम काढता येऊ शकते . परंतु आपण वर्षातून एकदाच या खात्यातून पैसे काढू शकत असतो .
 • – केंद्र सरकार कडून सुकन्या समृद्धी योजना करमुक्त ठेवली गेली आहे. यात गुंतवलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज, व तसेच मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त असते. एकूण म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना गुंतवणूकदारांना बचतीसोबतच कर सवलती ही मिळत असतात .
 • – गरज पडल्यास खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये सहज बदलता येत असते किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहज रित्या हस्तांतरित केले जाऊ शकते . मात्र हे तेव्हाच केले जाऊ शकते जेव्हा खातेदार मूळ ठिकाणाहून हलला असेल. अशा वेळी त्यांना स्थलांतराचा पुरावा दाखवावा लागत असतो. त्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेले खाते हस्तांतरित करण्यात येईल .

sukanya samriddhi yojana योजनेसाठी वयोमर्यादा

     10 वर्षांखालच्या मुलींच्या नावावर पालक किंवा कुटुंबातील कोणीही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडू शकत असतो. या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करणे अनिवार्य असते. व 21 वर्षा पर्यत रक्कम खात्यातून काढता येत नाही. 

sukanya samriddhi yojana
sukanya samriddhi yojana

योजनेचे व्याजदर-

या अल्पबचत योजनेवर मिळणारे व्याजदर केंद्र सरकार ठरवते. व्याजाचे दर हे 8.4% वरून 7.6% करण्यात आलेलं आहे. तसेच व्याज पूर्णपणे करमुक्त असते.

sukanya samriddhi yojana मधील शिल्लक रक्कम कशी तपासायची ?

आपल्याकडे लॉगिन क्रेडेन्शियल्स असणे गरजेचे आहे. लॉगिन क्रेडेन्शियल बँकेद्वारे प्रदान केले जाऊ शकते. मात्र, ही सुविधा सर्व बँकांमध्ये उपलब्ध नसते . यामुळे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडण्यापूर्वी बँकेच्या लॉगिन क्रेडेंशियल्सची खात्री करून घेणे आवश्यक असते . बँकेकडून लॉगिन क्रेडेन्शियल्स घेतल्यानंतर sukanya samriddhi yojana खात्यातील शिल्लक रक्कम देखील तपासू शकता. बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलला भेट द्यावी लागते. 

यामध्ये बॅलन्स चेक करण्याचा पर्याय होम पेजवर आपल्याला दिसेल . त्यावर क्लिक करून आपण सुकन्या समृद्धी खात्यातील शिल्लक रक्कम पाहू शकतो.

अधिकृत webside

sukanya samriddhi yojana जमा पैसे काढण्याचे नियम 
 1. या योजनेच्या मुदत पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडल्यानंतर 21 वर्षांनी किंवा आपली मुलगी 18 वर्षांची झाल्या नंतरच खात्यातून रक्कम काढता येत असते .
 2. मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी 50 टक्के रक्कम काढता येत असते. लाभार्थी एकरकमी किंवा हप्त्याने सुद्धा पैसे काढू शकतात. मागील आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात शिल्लक राहिलेल्या जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम काढता येऊ शकते.
sukanya samriddhi yojana योजनेचे खाते कधी बंद करता येते का ?
 1. सुकन्या समृद्धी योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करणे गरजेचं आहे. मात्र खलील प्रकरणांमध्ये खाते मुदत संपन्या अगोदर बंद केले जाऊ शकते.
 2. मुलीचा मृत्यू झाल्यास – ज्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडले गेलेले आहे ती मुलगी मरण पावल्यास , तर खाते बंद करण्यात येते .
 3. पालकाच्या मृत्यूनंतर – खाते ज्या पालकाद्वारे चालवले जात असते त्याच्या मृत्यूनंतरही खाते बंद करण्यात येऊ शकते.
 4. जीवघेण्या आजाराने त्रस्त असणाऱ्या खातेधारकाला जीवघेणा आजार झाला असेल तर खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
 5. परदेशात राहायला गेल्यावर किंवा लग्न झाल्यावर – मुलगी परदेशात स्थायिक झाल्यास. किंवा 21 वर्षांची होण्या अगोदर तिने परदेशात लग्न केले तर खाते बंद केले जाईल
 6. पालकाच्या मृत्यूनंतर – खाते ज्या पालकाद्वारे चालवले जात असेल त्याच्या मृत्यूनंतरही खाते बंद केले जाऊ शकते.
 7. जीवघेण्या आजाराने त्रस्त – खातेधारकाला जीवघेणा आजार असला तरीही खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
 8. परदेशात स्थायिक झाल्यावर किंवा लग्न झाल्यावर – मुलगी परदेशात स्थायिक झाल्यास. किंवा 21 वर्षांची होण्याआधी तिने परदेशात लग्न केले तर खाते अजूनही बंद केले जाईल.
 9. कमकुवत आर्थिक स्थिती -बऱ्याच वेळा अशी प्रकरणे देखील समोर आली आहेत की पालकांची आर्थिक स्थिती इतकी कमकुवत होते की ते गुंतवणुकीची रक्कम नियमितपणे देऊ शकत नाहीत. या प्रकरणात देखील खाते बंद केले जाऊ शकते.

sukanya samriddhi yojana चे खाते कसे उघडण्याचे ?

बँकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी पालकांच्या पालकांना या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरावी जसे की पालक किंवा पालकाचे नाव, मुलीचे नाव, वय इत्यादी माहिती.

.खाते उघडण्यासाठी लागत असणारा फॉर्म खाली दिलेला आहे. फॉर्म डाऊनलोड करून जवळच्या बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडा.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा..

FORM SSA -1

APPLICATION FOR OPENING AN ACCOUNT UNDER ‘SUKANYA SAMRIDDHI ACCOUNT’

sukanya samriddhi yojana साठी खलील कागदपत्रे आवश्यक:-

 1. मुलीचा जन्माचा दाखला लागेल.
 2. मुलीचा ओळखीचा पुरावा लागेल.
 3. मुलीचे आणि पालकांचे आधार कार्ड लागेल.
 4. जुळ्या किंवा तिहेरी मुलींच्या बाबतीत पालकाचे प्रतिज्ञापत्र लागेल.
 5. पालक किंवा पालकांचे पासपोर्ट आकाराचे फोटो लागेल.
 6. कायमचा पत्ता लागेल.

sukanya samriddhi yojana योजनेचे गणित. कसे कॅल्क्युलेट करतात रक्कम ?

सुकन्या समृद्धी योजनेच्या गणनेसाठी खालील सूत्र आहे A=P(1+r/n)^n

ज्यामध्ये A हे चक्रवाढ व्याज दर्शवते , P म्हणजे मूळ रक्कम, R म्हणजे गुंतवणुकीवर व्याजदर, N म्हणजे एका वर्षात चक्रवाढ व्याज आणि T म्हणजे कालावधी म्हणजे एकूण वर्षांची संख्या.

वरील सूत्रानुसार जी रक्कम मोजली जाते ती अर्जदाराला मुदत संपल्यावर दिली जात असते . यामध्ये दर वेळेचा हप्ता सारखाच होता असे गृहीत धरले जाऊन मोजले जात असते. 15 ते 21 व्या वर्षापर्यंत यामध्ये कोणत्याही गुंतवणुकीची गरज नसते . ही गणना जुन्या गुंतवणुकीच्या आधारे केली जात असते . कॅल्क्युलेटरद्वारे सुकन्या समृद्धी योजनेतील मुदतपूर्तीवर मिळालेली रक्कम शोधण्यासाठी मुलीचे वय आणि योगदानाची रक्कम नमूद करावी लागत असते . ज्यासाठी एका सूत्राचा वापर केला जात असतो.

या सूत्रानुसार, जर आपण सुकन्या समृद्धी योजनेत प्रत्येक वर्षी जर 1000 रुपये गुंतवले तर 14 वर्षांत एकूण गुंतवणुकीची रक्कम 14000 रुपये एवढी होईल. ज्यावर आपल्याला 21 वर्षांत जवळ जवळ 46,821 रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळेल. प्रत्येक वर्षी जर आपण 2000 रुपये गुंतवल्यास, मॅच्युरिटी रक्कम दुप्पट होऊन 93,643 रुपये एवढी होईल. म्हणजे यामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याजाचा लाभ देण्यात येईल.

आपण जर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एका वर्षात 1 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीचा कालावधी हा 15 वर्षाचा आहे. म्हणजे आपली एकूण गुंतवणूक 15 लाख रुपये होती. 7.6% व्याजदरानुसार, 21 वर्षांनंतर आपल्याला अंदाजे जवळपास 3,10,454.12 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच, मॅच्युरिटीच्या वेळी आपल्याला 43,95,380.96 रुपये या योजनेतून मिळतील. आणि विशेष म्हणजे ती रक्कम करमुक्त असेल.

sukanya samriddhi yojana इनकम टैक्स मध्ये सवलत-

आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत, गुंतवणूकदाराणे गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेवर दरवर्षी जवळ जवळ 1.5 लाख रुपयांपर्यंत करा मध्ये लाभ घेऊ शकतात.तसेच मुलींसाठी केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना देखील विशेष आहे कारण ती गुंतवणूकदारांना बऱ्याच प्रकारे कर लाभ देत असते. सर्वप्रथम, योजनेत गुंतवन्यात आलेली रक्कम, मिळालेले व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कम करमुक्त असते .

sukanya samriddhi yojana योजनेतील नवीन झालेले बदल पुढील प्रमाणे:-

सुरुवातीला हे वय 10 वर्षे पूर्ण झालेली मुलगी खाते ऑपरेट करू शकत होती.  परतू अत्ता 18 वर्षे वयाची कोणतीही मुलगी आता खाते ऑपरेट करू शकेल . 

यापूर्वी आपल्याला सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत एका वर्षात किमान 250 रुपये जमा करावे लागत असायचे . तसे न केल्यास योजनेंतर्गत डिफॉल्टर घोषित करण्यात येत होते . पण आता तसे राहिले नाही.

काही कारणास्तव तुम्ही 250 रुपये देखील जमा करू शकत नसाल तर व्याजदरात कोणताही बदल केले जाणार नाहीत किंवा आपल्याला डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाणार नाही.

यापूर्वी खाते वेळेपूर्वी बंद करण्याची दोनच मुख्य कारणे होती. प्रथम मुलीच्या आकस्मिक मृत्यूवर आणि दुसरी मुलगी NRI झाल्याबद्दल. मात्र आता सुकन्या समृद्धी योजनेचे खाते जरी जीवघेणे आजार आणि आई-वडील किंवा पालकाचा मृत्यू झाल्यावर पण बंद करता येतील.

माहिती आवडल्यास आपल्या नातेवाईक व मित्रांना पाटवा व अशाच माहितीसाठी आम्हा फॉलो करा खलील लिंक वर क्लिक करा.

Join Us On Whatsapp

येथे क्लिक करा

Join Us On Telegram

येथे क्लिक करा

आमची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा

 

प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता नव्या रूपात pradhan mantri matrutv vandna yojna pmmvy

pm kusum yojna कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023

Leave a Comment